दिलेल्या वेळेत आपण काय काय करू शकतो, याचा वस्तुपाठ देणारा बाबा होताच, पण जगन्मित्रही होता!
हा माणूस किती गोष्टी शिकला, याला काही मर्यादाच नाही. काष्ठशिल्प, बासरीवादन, पेन्सिल न उचलता झटपट चित्रं काढणं, साधं सोपं वागणं आणि तसंच लेखन, फोटोग्राफी, ओरिगामी, अशा अनेक कला या अवलियाला अवगत होत्या, त्याही एका आयुष्यात! रोजच्या जगण्यातला साधेपणा या दाढीवाल्या ‘बाबा’ने आपल्या वागण्यातून शिकवला.......